चंद्रकांत पाटील भेटले शेडेकर कुटुंबियांना

पुणे – राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्या कुटुंबियांची सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कात्रज येथील घरी जाऊन भेट घेतली. यावेळी पाटील यांनी सरकार प्रकाश शेडेकर यांच्या पाठिशी असल्याचे सांगितले.

आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात कणकवली येथे उपरस्त्यांच्या झालेल्या दुर्देशेवरून उपअभियंता शेंडेकर यांच्यावर चिखल ओतला होता. यापार्श्‍वभूमीवर पाटील यांनी शेडेकर यांची भेट घेतली. पाटील म्हणाले, सरकार अधिकाऱ्यांच्या पाठीशी असून शेडेकर यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. तसेच या प्रकरणी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.