मुंबई – पुण्यातील तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावरुन राज्यातील राजकारण वेगळ्या वळणावर जाताना दिसत आहे. या आत्महत्येमागे महाविकास आघाडीमधील एक मंत्री असल्याचे वारंवार सांगितले जात आहे. परंतु, हा मंत्री कोण आहे याचा उलगडा होत नव्हता. यादरम्यान भाजपाने पहिल्यांदाच जाहीरपणे शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव घेतले आहे. तसेच संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपा नेत्यानी केली आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: “त्या” मंत्र्याच्या “मुसक्या आवळायच्या सोडून वाट कसली पाहताय?”
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण :”त्या” मंत्र्याबाबत संजय राऊत म्हणाले…
पूजा चव्हाण प्रकरणातही जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजींनी कारवाई केली नाही तर महिलांचा राज्य सरकारवरचा विश्वास उडेल. pic.twitter.com/UOWvWU4ndj
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) February 12, 2021
याबाबत पत्रकारांनी बोलतांना चंद्रकांत पाटील म्हणाले,’ पोलिसांनी आतापर्यंत ज्या ऑडिओ क्लीप्स बाहेर आल्या आहेत त्याची सखोल चौकशी करावी. तसेच पोलिसांनी अजूनही पूजा चव्हाणचा लॅपटॉप चेक केलेला नाही. त्याची तपासणी केल्यास बरीच माहिती समोर येईल, असा दावा त्यांनी यावेळी केला आहे.
ते पुढे म्हणाले,’पूजा चव्हाण प्रकरणातही जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजींनी कारवाई केली नाही तर महिलांचा राज्य सरकारवरचा विश्वास उडेल. राज्य सरकारने पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करु नये . असं ट्विट करत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
तत्पूर्वी, भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. चित्रा वाघ यांनी ट्विटया संदर्भात एक केले असून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी पूजा चव्हाण घटनेत समोर आलेले सगळे अपडेट्स पाहता याचा थेट रोख शिवसेना मंत्री संजय राठोडांकडे जातो असे त्यांनी म्हटले आहे.