कोल्हापूर (प्रतिनिधी) – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर केलेली टीका ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या जिव्हारी लागली आहे. पाटील यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचा मुश्रीफ यांनी समाचार घेत सडेतोड उत्तर दिलय.
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील महा विकास आघाडीचे अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांवर शरसंधान साधले आहे.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1404047249934976/
राज्यातील सत्ता गेल्यामुळे चंद्रकांत पाटलांची अवस्था मानसिक संतुलन ढासळलेल्या मनोरुग्नासारखी झाली असल्याचं असल्याची टीका हसन मुश्रीफ यांनी दिली केली आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. दरम्यान, चंद्रकांत पाटील डोक्यावर परिणाम झाल्यासारखे, खुळ्यासारखे बडबडत आहेत अस असं देखील मुश्रीफ म्हणाले आहे.
दरम्यान, पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी पुण्यात आयोजित ओबीसी मेळाव्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली होती. चंद्रकांत पाटील म्हणाले की, राजकारणात येण्यापूर्वी मला शरद पवार मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर समजले की, ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केली होती.