सोलापूर : मराठा समाजाला ओसीबीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आंदोलनास बसले. यादरम्यान आंदोलनस्थळी जिल्ह्याचे पालकंमत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला असता मनोज जरांगे यांच्याकडून सगेसोयरे आणि हैदराबाद गॅझेटची मागणी करत मराठा समाजला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे. आता, या मागणीचा उल्लेख करताना सगेसोयरे हा कायदा देवेंद्र फडणवीसांनी 2017 सालीच केल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
रक्तसंबंध सगेसोयरे याचा अर्थ मला आरक्षण मिळाले तर माझ्या मुलांना आपोआप मिळणार यालाच सगेसोयरे म्हणतात. आईकडून येणारे रक्तसंबंध सुप्रीम कोर्ट मान्य करत नाही. त्यामुळे सगेसोयरेचा कायदा 2017 सालीच लागू झाला आहे, असे चंद्रकात पाटील यांनी सांगितले. तसेच, सरसकट मराठ्यांना कुणबी म्हटलं की ते कोर्टात जाईल, टिकेल की नाही माहिती नाही, असेदेखील चंद्रकांत पाटील म्हणाले.