मुंंबई- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यात गुप्त भेट झाली. या भेटीला अशा भेटी होतच राहतात, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलताना केलं.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यात गुप्त भेट झाली त्यांच्यात चर्चादेखील झाली. या चर्चेत नेमकं काय बोलणं झालं हे अजून पुढे आलं नसलं तरीदेखील या भेटीनंतर महाराष्ट्रात चर्चेला उधाण आलं आहे.
देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या भेटीवर आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे. राजकारणात दोन अधिक दोन चार कधीच होत नाही. शिवसेना ज्या अर्थी काँग्रेससोबत युती करू शकते तर राजकारणात काहीही होऊ शकते, असं विधान प्रवीण दरेकर यांनी केलं आहे.