कोल्हापूर: भाजप आणि सेनेला कोल्हापूरात आलेल्या अपयशाचे खापर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्यावर फोडले. कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी संजय मंडलिक यांच्यावर आखड पाखड केली.
संजय मंडलिक यांनी लोकसभेला कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या मदतीचा पैरा फेडणार असल्याचे जाहीर केल्याने कोल्हापुरात महायुतीला अडचणी निर्माण झाल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.
पश्चिम महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीपर्यंत महायुतीला राज्यातील सर्वच ठिकाणी खूप यश मिळाले. आता मात्र थोडी पिछेहाट झाली याचे आम्ही आत्मचिंतन करणार आहोत. आम्ही कोल्हापूरचा विकास केला. मात्र आम्हाला मत नाही आणि ज्यांनी कोल्हापूर बकाल केले त्यांना मतं मिळाली आहे. केवळ घोषणा करणाऱ्यांना मतं आणि काम करणाऱ्यांना नाकारणार का? असा सवाल देखील पाटील यांनी यावेळी केला.