“आशा’ कर्मचाऱ्यांची निराशा

चंद्रकांत पाटील यांच्या घराजवळ मोर्चा अडवला

कोल्हापूर (प्रतिनिधी) – मानधनवाढीसह इतर मागण्यांची दखल न घेतल्याने ‘आशा’ कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर काढलेला मोर्चा मंगळवारी पोलिसांनी संभाजीनगर बसस्थानकाजवळ अडवला. मानधनवाढीसह इतर मागण्यांसाठी गेले आठ दिवस आशा कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरु आहे. या मागण्यांची दखल घेतली नसल्याने कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर काढण्याचा निर्णय घेतला.

संभाजीनगर परिसरात सकाळी 11 नंतर या सर्व महिला हळूहळू जमल्या. याठिकाणी प्रचंड प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता. सुमारे तासभर या सर्वांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर त्या पालकमंत्र्यांच्या घराकडे
निघाल्या, तेव्हा बसस्थानकाजवळ पोलिसांनी हा मोर्चा रोखला.

दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर याप्रश्नी तोडगा काढण्यात येईल, असे आश्‍वासन दिले आणि बुधवारी दुपारपर्यंत निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले. यानंतर मोर्चा विसर्जित करण्यात आला. प्रारंभी चंद्रकांत यादव, भरमा कांबळे, शिवाजी मगदूम यांनी आशा व गटप्रवर्तकांना मार्गदर्शन केले. या आंदोलनाचे नेतृत्व नेत्रदीपा पाटील यांनी केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)