पुणे, – कोथरूड विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर मंगळवारी (दि. २९) हाती पेटती मशाल घेऊन पदयात्रेतून शक्तीप्रदर्शन करीत चंद्रकांत मोकाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
छत्रपती शिवाजी महाराज आणि महर्षि केशव धोंडीबा कर्वे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून पदयात्रेस सुरवात झाली. यावेळी शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहिर, खासदार वंदना चव्हाण, शहराध्यक्ष अंकुश काकडे, अभय छाजेड, विकासअण्णा पासलकर, लक्ष्मीवहिनी दुधाणे, स्वाती पोकळे, चंदूशेठ कदम,
प्रशांत बधे, दामोदर कुंबरे, शिवा मंत्री, योगेश मोकाटे, तानाजी निम्हण, शहरप्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, डॉ. अभिजित मोरे, गोपाळ तिवारी, राजेश पळसकर, विजय खळदकर, स्वप्निल दुधाणे, किशोर कांबळे यांच्यासह महिला, ज्येष्ठ नागरिक आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ठिकठिकाणी नागरिकांनी पदयात्रेचे स्वागत करीत शुभेच्छा दिल्या.