fbpx

चंद्रकांत दादांच्या वक्तव्याने ‘त्या’ मित्राचीच आठवण झाली – रोहित पवारांचा पलटवार

पुणे – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पाटील यांनी काल एका मेळाव्यामध्ये बोलताना, “राजकारणात येण्यापूर्वी मला पवार मोठे नेते वाटायचे, मात्र राजकारणात आल्यावर कळाले ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो,” असं वक्तव्य केलं होत. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पाटील यांच्यावर जोरदार प्रतिउत्तर देत आहेत.

अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील चंद्रकांत पाटील यांच्या टीकेवर पलटवार केला आहे. रोहित पवार यांनी याबाबत आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर, “सचिनकडून एखादा बॉल सुटला तर पोटावरील पॅकेटमधून एकेक पॉपकॉर्न खात घरात पाय पसरुन tv वर मॅच पाहणारा मित्र ओरडायचा… “अर्रर्रर्र सचिनला खेळताच येत नाही…”पवार साहेबांबाबत चंद्रकांत दादांनी केलेलं वक्तव्य ऐकून त्या मित्राचीच आठवण झाली आणि खूप हसूही आलं.” असा संदेश दिला आहे.


हसन मुश्रीफ यांचाही चंद्रकांत पाटलांवर निशाणा 

राज्यातील सत्ता गेल्यामुळे चंद्रकांत पाटलांची अवस्था मानसिक संतुलन ढासळलेल्या मनोरुग्नासारखी झाली असल्याचं असल्याची टीका हसन मुश्रीफ यांनी दिली केली आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. दरम्यान, चंद्रकांत पाटील डोक्यावर परिणाम झाल्यासारखे, खुळ्यासारखे बडबडत आहेत अस असं देखील मुश्रीफ म्हणाले आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.