मोदींविरोधात चंद्राबाबू नायडूंचे एकदिवसीय उपोषण; राहुल गांधींचा पाठिंबा 

नवी दिल्ली – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी दिल्लीत केंद्र सरकारविरोधात एकदिवसीय उपोषणास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याची मागणी चंद्राबाबू नायडू करत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नायडू यांना समर्थन दिले आहे.

चंद्राबाबू नायडू यांनी म्हंटले कि, जर तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर त्या कशा पूर्ण करायच्या आम्हाला चांगलेच माहित आहे. हा आंध्रप्रदेशातील लोकांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. जेव्हा कधी आमच्या स्वाभिमानावर हल्ला होईल आम्ही सहन करणार नाही. मी सरकारला आणि खासकरुन पंतप्रधानांना चेतावणी देत आहे की एकट्यावर हल्ला करणे थांबवा, असा इशारा त्यांनी दिला आहे.

राहूल गांधी यांनी म्हंटले कि, आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा. मी आंध्रप्रदेशच्या जनतेसोबत उभा आहे. ते कोणत्या पद्धतीचे पंतप्रधान आहेत. त्यांनी आंध्रप्रदेशच्या जनतेला दिलेले वाचन पूर्ण केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याठिकाणी जातात तेथे खोटे बोलतात. त्यांची विश्वासार्हता राहिलेली नाही.

दरम्यान, आंध्र प्रदेशला विशेष दर्जा आणि राज्य पुर्नगठन अधिनियम, २०१४ नुसार केंद्रसरकाने आपले वचन पूर्ण करण्याच्या मागणीसाठी आंध्रभवन एकदिवसीय उपोषणाला बसले आहेत. नायडू यांच्यासमवेत टीडीपी पक्षाचे सर्व नेते उपस्थित आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.