हैदराबाद – आंध्र प्रदेशचे मुख्यंमत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांच्या आदेशानुसार माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा ‘प्रजा वेदिका’ हा अलिशान बंगला पाडण्यात आला आहे. दरम्यान, या इमारतीत चंद्राबाबू राहात आहेत. काही दिवसांपूर्वीच नायडू यांनी जगनमोहन रेड्डी यांना पत्र लिहून प्रजा वेदिका इमारतीला विरोधी पक्षनेत्यांचे सरकारी निवासस्थान घोषित करण्याची मागणी केली होती. मात्र, वायएसआर कॉंग्रेसने अमरावतीतील प्रजा वेदिका इमारत ताब्यात घेतली आहे. तसेच आजपासून ही इमारत पाडण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी सूडभावनेने ही कारवाई केल्याचा आरोप तेलगू देशम पक्षाने केला आहे. या इमारतीतील विरोधी पक्षांचे कार्यालयातील महत्त्वाच्या वस्तू इमारतीबाहेर फेकण्यात आल्याचेही टीडीपीने म्हटले होते.
Andhra Pradesh: Demolition of ‘Praja Vedike’ building is underway in Amaravati. The building was constructed by the previous government led by N Chandrababu Naidu. pic.twitter.com/ZCpqBzmEZC
— ANI (@ANI) June 26, 2019