चांडोह ग्रामपंचायत भ्रष्टाचारप्रकरणी चौकशी करा

सविंदणे – चांडोह (ता. शिरूर) येथील ग्रामसेवक व सरपंच यांनी संगनमत करून मोठा आर्थिक भ्रष्टाचार केल्याप्रकरणी शिवसेना उपनेते शिवाजी आढळराव पाटील यांनी पत्राद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे यांना सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

यापूर्वीही ग्रामस्थांनी चांडोह भ्रष्टाचार प्रकरणी उपमुख्य कार्यकारी आधिकारी पुणे व गटविकास आधिकारी शिरूर यांना लेखी पत्राद्वारे निवेदन दिले होते. त्यामध्ये त्यांनी ग्रामसेवक व सरपंच यांनी कंत्राटदारांशी संगनमत करून अनेक बोगस बिले लाटली आहेत. त्यामध्ये आरोग्य तपासणी, महिला -मुलींना प्रशिक्षण, शेतकरी सहल, पाण्याची टाकी, ट्रॅक सूट खरेदी, गरोदर महिलांचा सकस आहार यामध्ये मोठा अपहार केल्याची लेखी तक्रार केली होती. तक्रारीनंतर तेथील ग्रामसेवक हे काही दिवसांसाठी फोन बंद करून फरार झाले होते. कुठल्याही प्रकारची व्यवस्थित चौकशी झालेली नाही. त्यामुळे अद्यापही ठोस कारवाई होत नसल्याने चांडोह येथील ग्रामस्थांनी शिवसेना उपनेते शिवाजी आढळराव पाटील यांची भेट घेऊन सर्व परिस्थिती त्यांच्या पुढे मांडून पुढील कार्यवाही होण्यासाठी मार्गदर्शन करण्यास सांगितले.

या भ्रष्टाचार प्रकरणी ग्रामस्थांच्या मागणीची तात्काळ दखल घेत आढळराव पाटील यांनी लेखी पत्राद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. आता चौकशी कधी होणार याकडेच चांडोह ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×