चंडीप्रसाद भट्ट यांना इंदिरा गांधी एकता पुरस्कार जाहीर

डेहराडून – उत्तराखंडमधील ज्येष्ठ गांधीवादी आणि पर्यावरणतज्ञ चंडीप्रसाद भट्ट यांना यंदाचा इंदिरा गांधी राष्ट्रीय एकता पुरस्कार जाहीर झाला आहे. कॉंग्रेस पक्षाच्या वतीने संबंधित प्रतिष्ठेच्या पुरस्काराने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांना सन्मानित केले जाते.

यंदाचा पुरस्कार नवी दिल्लीत 31 ऑक्‍टोबरला होणाऱ्या सोहळ्यात कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते भट्ट यांना प्रदान केला जाईल. पर्यावरण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना याआधी रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

त्याशिवाय, पद्मभूषण या नागरी सन्मानानेही त्यांना गौरवण्यात आले. चिपको आंदोलन या पर्यावरणविषयक महत्वाच्या चळवळीतील सहभागामुळे भट्ट यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. इंदिरा गांधी एकता पुरस्काराने याआधी अनेक दिग्गजांना सन्मानित करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.