मुंबई – मध्य महाराष्ट्रावरील चक्रीय चक्रवात निवळला असून राज्यात ३ दिवस हवामान कोरडे राहील. त्यामुळे किमान तापमानात सरासरीपेक्षा दोन ते तीन अंशाने घसरण होऊन थंडी वाढण्याचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तवला आहे.
तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये ११ व १२ जानेवारी रोजी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ तसेच कोकणात किमान तापमानात अधिक घसरण होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या तापमान कमालीचे चढ-उतार पाहावयास मिळत आहेत.