पहाटे थंडी, दिवसा ऊन आणि आता पावसाचीही शक्यता

पुणे : मागील काही दिवसांपासून शहरातील थंडीचा पारा कमी जास्त होत होता. मात्र मंगळवारपासून (16 फेब्रुवारी) पुढील 3 दिवस शहरात ढगाळ वातावरण होण्याची शक्यता असून, गुरूवारी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

 

 

उत्तर मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या भागात चक्रीय चक्रवात कायम आहे. तर उत्तर केरळ किनारपट्टी आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील असलेला चक्रीय चक्रवाताचा कमी दाबाचा पट्टा आता कर्नाटक किनारपट्टी ते उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत आहे. मागील 24 तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. तर मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ होणार आहे.

 

 

तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे. यासह राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. पुणे आणि आसपासच्या परिसरात मंगळवारी (16 फेब्रुवारी) आकाश मुख्यत: निरभ्र राहून दुपारनंतर आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

 

 

तर बुधवारी (17 फेब्रुवारी) आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असून, दुपारनंतर आकाश सामान्यत: ढगाळ राहून मेघगर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यासह गुरूवारी (18 फेब्रुवारी) आकाश सामान्यत: ढगाळ राहून मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.