क्रुड आणि सोन्याच्या आयातीत झाली मोठी वाढ
नवी दिल्ली: एप्रिल महिन्यात निर्यात किरकोळ वाढली तर आयातीत बरीच वाढ झाली आहे. त्यामुळे व्यापारातील तूट वाढण्याची शक्यता आहे. जर परिस्थिती सुधारली नाही तर भारताच्या चालू खात्याच्या तुटीवर परिणाम होऊ शकतो.
वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल महिन्यात भारताची निर्यात केवळ 0.64 टक्क्यांनी वाढली. या महिन्यात भारताने 26 अब्ज डॉलरची निर्यात केली आहे. त्या तुलनेत एप्रिल महिन्यात आयात 4.5 टक्क्यांनी वाढून 41.4 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. त्यामुळे व्यापारातील तूट 15.13 अब्ज डॉलरवर गेली आहे गेल्या वर्षी ही तूट 13.72 अब्ज डॉलरएवढी होती.
इंधनाची आयात 9.26 टक्क्यांनी वाढून 11.38 अब्ज डॉलरएवढी झाली आहे. त्याचबरोबर या महिन्यात सोन्याच्या आयात 54 टक्के वाढूून ही आयात 3.97 अब्ज डॉलरवर गेले आहे.