रिअल इस्टेटमध्ये तेजीची शक्‍यता

2019 मध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात तेजी येण्याची शक्‍यता मालमत्ता सल्लागार कंपनी सीबीआरईने व्यक्‍त केली आहे. रिअल इस्टेट बाजार आतापर्यंत रेरा, जीएसटी आणि नोटाबंदीच्या धोरणात्मक निर्णयामुळे झाकोळला गेला होता. आता रिअल इस्टेट बाजाराची सुधारणांकडे वाटचाल होत आहे.

निवासी, कार्यालय, ठोक आणि लॉजिस्टिकसह सर्व क्षेत्रात एकूणात 2019 मध्ये 20 कोटी चौरस फूट जागांची गरज लागण्याची चिन्हे आहेत. अहवालानुसार भारतात रिअल इस्टेट मालमत्तेचा स्टॉक यावर्षाखेर वाढून तो 3700 अब्ज चौरस फूटपर्यंत पोचेल, असे सांगितले जात आहे. तत्रज्ञांनाची मागणी, पूर्ततेची स्थिती, औद्योगिक सुलभता यासारख्या गोष्टीत 2019 मध्ये भारतीय रिअल इस्टेट बाजारातील दिशा निश्‍चित होईल. या आधारावरच नवीन घरांच्या हस्तांतरणात वार्षिक सुमारे 15 टक्के वाढ होण्याची शक्‍यता आहे. तसेच विक्रीत 13 टक्के वाढीची शक्‍यता आहे.

– मानसी जोशी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.