Champions Trophy | 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानमध्ये

दुबई :- 2025 साली होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे. तब्बल दोन दशकांनंतर पाकिस्तानमध्ये एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. आज झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

2024 साली होणाऱ्या 20 षटकांच्या विश्‍वचषक स्पर्धेचे सह आयोजन अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन्ही देशांमध्ये केले जाणार आहे. स्पर्धा आयोजनाच्या पुढील फेरीत “आयसीसी’ची स्पर्धा आयोजित करण्याचा मान भारताला मिळणार आहे.

त्यामध्ये 2026 साली होणाऱ्या टी-20 विश्‍वचषक स्पर्धा आणि 2031 मध्ये होणाऱ्या 50 षटकांच्या विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेचाही समावेश असणार आहे. या स्पर्धा भारताबरोबर श्रीलंका आणि बांगलादेशातही सह आयोजित केल्या जाणार आहेत. याशिवाय 2029 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे पूर्ण आयोजन भारतात केले जाणार आहे.

1996 सालच्या विश्‍वचषक स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान, श्रीलंका आणि भारतात एकाचवेळी केले गेले होते. मात्र 2009 साली लाहोरमध्ये श्रीलंकेच्या खेळाडूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले गेले नव्हते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.