रोम –पोर्तुगालचा अव्वल खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने फटकावलेल्या दोन गोलमुळे युवेन्ट्स संघाने लियॉनवर 2-1 असा विजय मिळवला असला तरीही त्यांना साखळीतील अपयशी कामगिरीमुळे चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतून आव्हान संपुष्टात आल्याने बाहेर पडावे लागले.
सामन्याला प्रारंभ झाल्यावर लियॉनच्या मेम्फिस डीफे याने 12 व्या मिनिटाला गोल केला व संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र, त्यानंतर युवेन्ट्सच्या रोनाल्डोने आपला दर्जा पुन्हा एकदा सिद्ध करताना पहिल्याच हाफमध्ये गोल केला व संघाला सामन्यात बरोबरी प्राप्त करून दिली. त्यानंतर दुसरा हाफ सुरू झाल्यावरही त्याने गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले पण त्याचे गोलमध्ये रूपांतर करणे त्याला शक्य झाले नाही. मात्र, गोल करण्याची मिळालेली आणखी एक संधी त्याने वाया घालवली नाही व 60 व्या मिनिटाला सुरेख गोल केला व संघाला 2-1 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.
अर्थात, हा विजय त्यांना चटका लावणाराच ठरला. या विजयानंतरही साखळीतील अपयशामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. 1996 नंतर आजपर्यंत युवेन्ट्सला ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. 2015 सालच्या मोसमानंतर आता यंदा प्रथमच युवेन्ट्सला या स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे.
रोनाल्डोची कामगिरी मात्र, या संपूर्ण स्पर्धेतील समाधानकारक गोष्ट ठरली. त्याने या स्पर्धेच्या इतिहासातील 131 गोल पूर्ण केले तसेच युवेन्ट्सकडून खेळताना त्याने सर्व स्पर्धांमध्ये मिळून 37 गोल नोंदवले.