चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा : मेस्सीच्या कामगिरीने बार्सिलोनाची आगेकूच

बार्सिलोना – लिओनेस मेस्सीने डाव्या पायाला झालेल्या दुखापतीनंतरही केलेल्या दोन अफलातून गोलच्या जोरावर बार्सिलोनाने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत नापोलीवर 3-1 असा विजय मिळवला. ऍग्रीगेट गुणांच्या मदतीने या विजयाची नोंद 4-2 अशी झाली असली तरीही बार्सिलोनाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला हेच या सामन्याचे वैशिष्टय ठरले.

या फेरीत आता त्यांची लढत बायर्न म्युनिकशी होणार आहे. या सामन्यात सगळे गोल पहिल्याच हाफमध्ये नोंदले गेले. 10 व्या मिनिटाला बार्सिलोनाच्या क्‍लेमेंट लेंग्लेटने पहिला गोल केला. त्यानंतर 23 व्या मिनिटाला मेस्सीने संघाचा दुसरा गोल करत 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.

त्यानंतर जादा वेळेत पहिल्या मिनिटाला लुइस सुआरेझने बार्सिलोनाला तिसरा गोल पेनल्टीद्वारे नोंदवून दिला. पाचव्या मिनिटात लोरेन्झो इन्साइनेही पेनल्टीवरच गोल करत बार्सिलोनाची आघाडी कमी करत सामना 3-1 असा झाला. पण उत्तरार्धात मात्र एकही गोल होऊ शकला नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.