नवी दिल्ली – श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज आणि श्रीलंका क्रिकेट मंडळ यांच्यातील वाद आता संपला आहे. त्यामुळे चमिंडा वासने आपला राजीनामा माघारी घेतला आहे. त्याचबरोबर चमिंडा वास श्रीलंका संघाचे वेगवान गोलंदाजीचे कोच या पदावर राहण्यास तयार आहेत.
मागील महिन्यात 47 वर्षीय चमिंडा वासने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्याची गिनती फक्त श्रीलंकेच्या नाही, तर जगातील दिग्गज वेगवान गोलंदाजांमध्ये होते. श्रीलंका क्रिकेट मंडळाने सांगितलें आहे की, “चमिंडा वास आणि श्रीलंका क्रिकेट मंडळांच्या टीममध्ये बैठक झाली आहे. ज्यामध्ये तो मुद्दा सर्वांच्या सहमतीने सोडवण्यात आला आहे. ज्यामुळे चमिंडा वासने राजीनामा दिला होता.”
यामध्ये म्हणले आहे की, “चमिंडा वासने राजीनामा माघारी घेतला आहे आणि तो श्रीलंका क्रिकेट संघाच्या वेगवान गोलंदाजांचा कोच म्हणून राहणार आहे.” चमिंडा वासने आपल्या कारकिर्दीत 111 कसोटी आणि 322 वनडे सामने खेळले आहेत. त्याचबरोबर 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंका संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने कसोटीत एक शतक आणि 13 अर्धशतकाच्या सोबत 355 विकेट्स घेतल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 400 विकेट्स आहेत.
चमिंडा वासने मागील महिन्यात वेस्ट इंडिज दौर्यावर जाण्या अगोदर वेगवान गोलंदाजाी कोच पदावरून राजीनामा दिला होता. नियुक्त केल्यानंतर लगेच त्याने राजीनामा दिला होता. यामागे आर्थिक कारण असल्याचे चर्चा होती.