#IPL2021 ( RCBvMI ) : मुंबईला विजयासाठी 166 धावांचे आव्हान

कोहली व ग्लेन मॅक्‍सवेलची दमदार अर्धशतकी खेळी

दुबई – कर्णधार विराट कोहली व ग्लेन मॅक्‍सवेल यांच्या दमदार अर्धशतकी खेळींच्या जोरावर रॉयल चॅलेंजर बेंगळुरूने मुंबई इंडियन्समोर विजयासाठी 166 धावा करण्याचे आव्हान ठेवले.
मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत बेंगळुरूला प्रथम फलंदाजी दिली.

सलामीवीर देवदत्त पडीक्कलने निराशा केली. त्यानंतर श्रीकर भरतने कर्णधार कोहलीला सुरेख साथ देत संघाचा डाव सावरला. भरतही स्थिरावला असे वाटत असतानाच बाद झाला. त्याने 24 चेंडूत 2 चौकार व 2 षटकार फटकावताना 32 धावांची खेळी केली. त्यानंतर आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्‍सवेलने कोहलीला साथ देत संघाचे शतक फलकावर लावले.

दरम्यान, कोहलीने अफलातून अर्धशतक पूर्ण केले. मात्र, त्यानंतर धावांचा वेग वाढवताना तो बाद झाला. त्याने 42 चंडूत 3 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 51धावांची खेळी केली. त्यानंतर बेंगळुरूच्या फलंदाजीची सूत्रे मॅक्‍सवेलने हाती घेत संघाला दीडशतकी पल्ला पार करून दिला. एबी डीविलियर्सने 11 धावा करताना मॅक्‍सवेलला साथ देण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, मॅक्‍सवेलनेही अर्धशतकी टप्पा गाठला. त्याने 56 धावांच्या खेळीत 37 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार व 3 षटकार अशी आतषबाजी केली. जसप्रीत बुमराहने त्यानंतर मात्र बेंगळुरूच्या या दोन्ही फलंदाजांना बाद केले. त्याने या डावात 3 गडी बाद केले. बेंगळुरूचा डाव 20 षटकांत 6 बाद 165 असा रोखला गेला.

संक्षिप्त धावफलक – रॉयल चॅलेंजर बेंगळुरू – 20 षटकांत 6 बाद 165 धावा. (ग्लेन मॅक्‍सवेल 56, विराट कोहली 51, श्रीकर भरत 32, एबी डीविलियर्स 11, जसप्रीत बुमराह 3-36).

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.