श्रद्धा कपूरच्या घरात चक्‍क गोरीला.!

बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या आपल्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. अलीकडेच तिच्या “चालबाज इन लंडन’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. पण, सध्या या चित्रपटामुळे नाही, तर श्रद्धा तिच्या एका इन्स्टाग्राम व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. श्रद्धाच्या घरात अचानक एक गोरीला शिरला होता. मात्र, या गोरीलाला पळवून लावण्याऐवजी या व्हिडिओमध्ये ती त्याच्याबरोबर मजेदार डान्स करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

अभिनेत्री श्रद्धा कपूर सोशल मीडियावर खूप ऍक्‍टिव्ह आहे. ती सतत तिच्या चाहत्यांसोबत संपर्कात असते. परंतु, तिने नुकताच शेअर केलेला व्हिडिओ पाहून तिचे चाहते स्तब्ध झाले आहेत. कारण, या व्हिडिओमध्ये तिच्याबरोबर एक अतिशय भयानक आणि आक्राळ-विक्राळ गोरीलादेखील दिसतो आहे. मात्र, त्याची भीती वाटण्याऐवजी किंवा घाबरण्याऐवजी श्रद्धा कपूर त्याच्याबरोबर धमाल मस्ती करत, छान ठुमके लगावत आहे.

लवकरच ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर “हॅलो चार्ली’ हा साहसी कथेवर आधारित चित्रपट प्रदर्शित होणार आहे. श्रद्धा आणि गोरीलाचा हा व्हिडिओदेखील या चित्रपटाच्या प्रमोशनचा एक भाग असल्याचे दिसते आहे. कारण, या चित्रपटात टोटो गोरीला आणि सरळ साधा चार्ली (आदर जैन) यांची गंमत पाहायला मिळणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.