नवी दिल्ली – देशभर चक्काजाम आंदोलनाची घोचषणा केल्यानंतर हरियाणा पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. महत्त्वाच्या ठिकाणी आणि रहदारीच्या मार्गावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
सर्व जिल्हा पोलीस अधिक्षकांना कडेकोट बंदोबस्त ठेवण्याची सूचना करण्यात आल्याचे हरियाणा पोलिसांनी सांगितले. स्थानिक शेतकरी नेत्यांशी चर्चा करून आंदोलन शांततेत पार पडेल याची खात्री करून घ्यावी, अशीही सूचना करण्यात आली आहे.