‘चासकमान’ भरले; 10 हजार क्‍युसेकने विसर्ग

धरण 98 टक्‍के : भीमा नदी “ओव्हरफ्लो’; पावसाचा जोर कायम

चासकमान – खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात पावसाचा जोर कायम चासकमान धरण 98 टक्‍के भरल्याने धरणातील सांडव्याद्वारे 10 हजार क्‍युसेक तर कालव्याद्वारे 550 क्‍युसेक असा एकूण 10 हजार 550 क्‍युसेकने भीमा नदीत विसर्ग सुरू असल्याने भीमा नदी दुथडी भरून वाहत असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
त्यातच पावसाचा जोर पुन्हा वाढला असून हा जोर कायम राहिल्यास विसर्ग आणखी वाढवण्यात येईल, अशी माहिती उपअभियंता यू. एम. राऊत यांनी दिली.

कळमोडी धरण याआधीच “ओव्हरफ्लो’ झाले असल्याने धरणातून 2,509 क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे चासकमान धरणातील पाणीसाठा जलद गतीने वाढत आहे. तर आता चासकमान धरणातून विसर्ग सुरू असल्याने भीमा नदीवरील लहान बंधारेसुद्धा “ओव्हरफ्लो’ झाले आहे.

रविवार दुपारी 12 वाजेपर्यंतची आकडेवारी
धरणाची एकूण पाणीपातळी -649.29 मीटर
एकूण पाणीसाठा -237.67 दलघमी
उपयुक्‍त पाणीसाठा -210.48 दलघमी
टक्‍केवारी -98.13
कालव्यातून सोडलेले पाणी -550 क्‍युसेक
सांडवाद्वारे सोडलेले पाणी -10 हजार क्‍युसेक
एकूण 10 हजार 550 क्‍युसेकने पाणी सोडले जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.