महाळुंगे इंगळे – करोना प्रतिबंधासाठी चाकण व पंचक्रोशीतील निराधार, गरजू, गरीब, कामगार, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती आणि दुर्धर आजारी रुग्ण तसेच पीडित व्यक्तींसाठी चाकण येथील अस्मिता सेवा समितीच्या वतीने लॉकडाऊन कालावधीत शिवभोजन योजना सुरू करण्यात आली आहे.
यामध्ये गरीब व गरजू, रुग्णांचे हाल होऊ नयेत, यासाठी अस्मिता सेवा समितीच्या माध्यमातून शिवभोजन योजना सुरू केली आहे. थेट दवाखाना अथवा घरपोच ही सेवा सुरु करण्यात आली आहे.