पुणे : विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने युवकांच्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे. बाणेरचे पै. महादेव अशोक चाकणकर यांची पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष महारष्ट्र राज्य रुपाली ताई चाकणकर, खासदार वंदना ताई चव्हाण, हडपसर विधान सभा मतदार संघाचे आमदार चेतन तुपे , पुणे शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस अध्यक्ष मा. महेश हांडे यांच्या उपस्थितीत हि निवड करण्यात आली. तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.