पुणे – ऊर्जा क्षेत्रातील महत्वाचे स्तंभ किंबहुना ऊर्जा आणि समाज यांना जोडून ठेवणारा सेतू म्हणून लाईनमन (वीज तंत्रज्ञ) यांना संबोधले जाते. त्यांच्याप्रती कृतज्ञता आणि त्यांचा सन्मान म्हणून 4 मार्चला ‘राष्ट्रीय लाईनमन दिवस’ साजरा केला जातो. ऊर्जा (वीज) क्षेत्रातील दुरुस्ती विभागाचे कर्मचारी आणि लाईनमन हे दैनंदिन दुरूस्तीचे काम अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत करतात. ज्यायोगे नागरिकांना वीज वितरण तर होतेच याशिवाय देशात कुठल्याही दुर्घटना टाळल्या जातात. 4 मार्च 2021 पासून लाईनमन दिवस साजरा करायला सुरुवात झाली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित उपविभाग चाकण आणि राजगुरुनगर विभागाच्या वतीने चाकण येथे रष्ट्रीय लाईनमन दिवसाचे आयोजन केले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रभारी कार्यकारी अभियंता घोठवड, चाकण उपविभागचे उपकार्यकारी अभियंता गारगोटे, राजगुरूनगर शहर शाखेचे सहाय्यक अभियंता सावंत, चाकण ग्रामीण शाखेचे सहाय्यक अभियंता नरवडे, चाकण शहरचे सहाय्यक अभियंता मुळुक, चाकण उपविभाग येथिल कनिष्ठ अभियंता मोटे, पाईत सेक्शन शाखा अभियंता झोनवाल, राजगुरूनगर ग्रामीण शाखेचे सहाय्यक अभियंता ओहळ, आळंदी शहर शाखेचे अभियंता सुभाष धापसे, ग्रामीण शाखेचे अभियंता ज्ञानेश्वर गिते, विभागीय कर्मचारी आणि राजगुरूनगर व चाकण उपविभाग कर्मचारी वर्ग उपस्थित होते.