पुणे – आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांच्या संयोजनासाठी पुणे शहर विभागीय क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी ए. आय. एस. एस. एम. एस. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. बोरमाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्याध्यक्षपदी मॉडर्न एज्युकेशन सोसायटी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए. ए. केस्ते यांची नियुक्ती झाली आहे.
पुणे शहर विभागीय सचिव पदी ए. ए. आय. एस. एस. एम. एस. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण संचालिका डॉ. मनिषा कोंढरे यांची निवड झाली. विभागीय क्रीडा समितीची पहिली सर्वसाधारण सभा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये शैक्षणिक वर्षं 2019-20 या वर्षाकरिता नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
कार्यकारिणी – अध्यक्ष : प्राचार्य डॉ. डी. एस. बोरमाणे, कार्याध्यक्ष : डॉ. ए. ए. केस्ते, उपाध्यक्ष : प्रा. रवी पाखरे, प्रा. डॉ. पोपट धनवे, प्रा. डॉ. मुरलीधर गायकवाड. आंतरविभागीय सचिव : डॉ. मनिषा कोंढरे, आंतर महाविद्यालयीन सचिव : प्रा.प्रसाद भोगे, आंतर महाविद्यालयीन सहसचिव :प्रा. अनिरुद्ध शर्मा, खजिनदार: प्रा. उमेश बिबवे, सदस्य: प्रा. अनघा चिकटे, प्रा. शांताराम ढमाले, प्रा. मधुकर पांडकर, प्रा. डॉ. आशा बेंगळे, प्रा. डॉ. अयाज हुसेन शेख, प्रा. डॉ. सुदाम शेळके, निमंत्रित सदस्य : प्रा. अभिजित पार्से, प्रा. मिथुन त्रिभुवन.