पुणे – करोनासारख्या संसर्गाच्या काळात विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळाला आणि संयम ठेवत खूप अभ्यास केल्याने विद्यार्थ्यांना एमएचटी-सीईटीत चांगले गुण मिळाले.
यंदा विद्यार्थ्यांना पर्सेंटाइल कमी आले असली तरी त्यांचे रॅंकिंग चांगले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना यावर्षी त्यांच्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची चिन्हे आहेत.
राज्य सीईटी सेलने अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवीच्या सीईटीचा निकाल जाहीर केला. या सीईटीसाठी राज्यभरातून 3 लाख 86 हजार 604 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
लॉकडाऊनमुळे परीक्षा लांबणीवर पडत असल्याने व जेईई मेन्स परीक्षांचा निकाल जाहीर झाल्याने एमएचटी-सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा कमी होती. यंदा सीईटी निकालात विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाल्याचे दिसून येत आहे.