बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 9 एप्रिलपासून प्रमाणपत्र वाटप

विद्यार्थ्यांची ओएमआर गुणतक्‍ता व प्रात्यक्षिक साहित्यही वाटप होणार

 

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने नोव्हेंबर 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे येत्या 9 एप्रिल रोजी महाविद्यालयांना वाटप होणार आहेत.

एप्रिल-मे 2021 मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची ओएमआर गुणतक्‍ता व प्रात्यक्षिक साहित्यही वाटप होणार आहे. यासाठी जिल्हानिहाय वितरण केंद्राची व्यवस्था केली आहे. कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांनी निर्धारित वेळेत प्रमाणपत्रे व साहित्य स्वीकारणे आवश्‍यक आहे.

याबाबतच्या सूचना पुणे विभागीय मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी पुणे, अहमदनगर, सोलापूर या जिल्ह्यांतील मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दिल्या आहेत.पुणे शहर, हवेली, शिरुर, खेड, पुरंदर या तालुक्‍यांसाठी शिवाजीनगर येथील पुणे विभागीय मंडळ हे वाटप केंद्र असणार आहे.

पिंपरी-चिंचवड, मावळ, मुळशी या तालुक्‍यांसाठी पिंपरीतील जयहिंद हायस्कूल, भोर व वेल्ह्यासाठी भोरमधील राजा रघुनाथराव विद्यालय, बारामती, दौंड, इंदापूर तालुक्‍यांसाठी बारामतीतील एम.ई.हायस्कूल, आंबेगाव व जून्नर तालुक्‍यांसाठी नारायणगाव येथील गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर या ठिकाणी वाटप केंद्र सज्ज ठेवण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.