ईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा 

अहमदाबाद : काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी आज एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना ईव्हीएम मशीनबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना पित्रोदा यांनी सांगितले की, त्यांना ईव्हीएम मशीनमध्ये काहीतरी गडबडी असल्याचे जाणवते मात्र त्यांच्याकडे अभ्यासासाठी ईव्हीएम मशीन उपलब्ध नसल्याने मशीनमध्ये नेमकी काय गडबड आहे हे स्पष्ट करण्यात ते अयशस्वी ठरत आहेत.

“मी एक इंजिनियर आणि तंत्रज्ञान विषयक तज्ञ असून मी ईव्हीएम मशीनबाबत समाधानी नाहीये. माझ्याकडे अभ्यासासाठी ईव्हीएम नसल्याने मी या मशीनमध्ये नेमका काय घोटाळा आहे हे सांगू शकत नाहीये. मात्र जर माझ्याकडे एक वर्षभरासाठी ईव्हीएम मशीन अभ्यासासाठी दिले तर नक्कीच यातील दोष शोधून काढेन. मात्र यावेळी मी एवढंच निश्चितपणे सांगू शकतो की ईव्हीएम मशीनमध्ये काहीतरी घोटाळा आहे.” असं त्यांनी सांगितलं.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.