सिरॅमिक इंजिनिअरिंगमधील कारकिर्द

-राकेश माने

बऱ्याचशा इंजिनिअरिंग क्षेत्रातील कामासाठी सिरॅमिक मटेरिअल उपयोगाचे असते. सिरॅमिक इंजिनिअरींग हे सिरॅमिक मटेरिअल्सपासून वेगवेगळ्या आवश्‍यक वस्तू, उपकरणे तयार करण्याचे तंत्र होय. इलेक्‍ट्रिकल इंजिनिअरिंग, मटेरिअल्स इंजिनिअरिंग, केमिकल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग या क्षेत्रातील अनेक जण सिरॅमिकच्या गुणवैशिष्ट्यांकडे आकर्षित होऊन वळत आहेत. उष्णतेचे तीव्र रोधक म्हणून वापरण्यात येणारे सिरॅमिक इतरही अनेक गोष्टींसाठी वापरले जाते ज्या ठिकाणी मेटल्स आणि पॉलिमर्स वापरता येत नाहीत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या व्यतिरिक्‍त सिरॅमिक हे फाईन आर्टदेखील असून त्यातीलही सखोल ज्ञान मिळवता येते. नव्या ऑफिसचे अथवा इमारतीचे डिझाईन करायचे असेल किंवा बेडरूमध्ये एखादा कॅनव्हास हवा असेल तर या ठिकाणी सिरॅमिक इंजिनिअरची गरज भासते. सिरॅमिस्टस हा सिरॅमिक आणि इंजिनिअरिंग यांना एकत्रित करून नवे आणि अधिक आकर्षक काम करण्यासाठी मदत करतो. यासाठी नव्या मटेरिअल्सचा वापर करतो. आपण स्वप्नातही विचार केला नसेल अशी निर्मिती तो करतो.

केमिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्‍ट्रिकल इंजिनिअरिंग यापैकी कुठल्याही क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्‍ती सिरॅमिक इंजिनिअरिंगचे प्रशिक्षण घेऊ शकतात. अलिकडेच या क्षेत्रात सिंगल क्रिस्टल्स किंवा ग्लास फायबर्सचासुद्धा अभ्यास सुरु झाला आहे.

कामाचे स्वरुप : केमिकल इंजिनिअर्स यांना शास्त्रीय आणि उत्पादनाच्या दृष्टीने अनुभव असतो. त्यामुळे ते ऍडमिनिस्ट्रेटर्स, प्रोजेक्‍ट सुपरवायझर्स, सेल्स इंजिनिअर्स आणि टेक्‍निकल कन्स्लटंट म्हणून देखील काम करू शकतात. बरेचशे सिरॅमिक इंजिनिअर्स न्युक्‍लियर क्षेत्रात सिरॅमिक फ्युएल मटेरिअल्सपासून न्युक्‍लिअर पॉवर तयार करण्याचे काम करतात. हे तंत्रज्ञान वाढण्यासाठी इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंडस्ट्री हे क्षेत्र उपलब्ध आहे. कारण ट्रान्झीस्ट्रर्सचे इन्सुलेटर्स आणि इंटिग्रेटेड सर्किट्‌स बनविण्यासाठी सिरॅमिक वापरले जाते. इतरही अनेक ठिकाणी सिरॅमिकचा वापर होत आहे.

फायबर ऑप्टिक्‍सचे अणखी एक आव्हानात्म असे नवे क्षेत्र आहे, ज्याने सध्याच्या टेलीकम्युनिकेशन आणि मेडिकल इंडस्ट्रीमध्ये मोठा परिणाम घडवून आणला आहे. यामध्ये देखील सिरॅमिक कॉम्पोनंट वापरतात. सिरॅमिक इंजिनिअर्स या नव्या विज्ञान क्षेत्रात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. सिरॅमिक इंजिनिअर म्हणून काम करताना ऍडमिनिस्ट्रेटर, प्रोजेक्‍ट सुपरवायझर, सेल्स इंजिनिअर्स किंवा टेक्‍निकल कन्स्लटंट म्हणून देखील काम करावे लागते. अनेक क्षेत्रांशी संबंधित असणाऱ्या सिरॅमिक इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात भविष्यात खूप चांगल्या संधी आहेत.

अभ्यासक्रम राबवणाऱ्या प्रमुख संस्था.

  • इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स, बंगळुरू.
  • एस.जे. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मैसूर.
  • डॉ. डि.वाय.पाटील इंजिनिअरिंग कॉलज, पुणे.
  • यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नागपूर.
  • एस.टी.ई. सोसायटीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे.
  • पुणे इन्स्टिट्युट ऑफ कॉम्प्युटर टेक्‍नॉलॉजी, पुणे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)