क्रिप्टोकरन्सी कंपनीच्या सीईओचा भारतात मृत्यू; बॅंक खात्यात अडकले कोट्यावधी डॉलर्स

कॅनडातील 11 लाख गुंतवणूकदारांचे भवितव्य अधांतरी

टोरांटो/मुंबई : काल परवापर्यंत गेरॉल्ड कॉटन हे नाव कॅनडा बाहेर फारसं कोणाला माहित नव्हतं. परंतू आज जगभरातले सायबर तज्ज्ञ त्याच्या बॅंक अकाउंटचा पासवर्ड शोधण्यात गुंतले आहेत. याचे कारण म्हणजे, गेरॉल्डच्या बॅंक खात्यात जमा असलेले 190 कोटी डॉलर्स. त्यामुळे कॅनडातील सुमारे 11 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांचे भवितव्य अधांतरीच आहे.

कॅनडाच्या गेरॉल्ड कॉटन हा क्वाड्रीगासी एक्‍स या क्रिप्टोकरन्सी कंपनीचा सीईओ आणि सह-संस्थापक होता. जेमतेम तिशीत असलेला गेरॉल्ड हे एक अनाथाश्रम सुरु करण्यासाठी भारतात आला होता. भारतात आल्यानंतर गेरॉल्ड आजारी पडला आणि या आजारपणातच त्यांचा गतवर्षी डिसेंबर महिन्यात मृत्यू झाला. परंतू गेरॉल्डच्या बॅंक खात्यात कंपनीच्या 11 लाख गुंतवणूकदारांचे तब्बल 180 कोटी डॉलर्स अडकले आहेत. त्यामुळे जगभरातील अनेक सायबर तज्ज्ञ सध्या गेरॉल्डच्या बॅंक अकाउंटचा पासवर्ड शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

गेरॉल्डच्या मृत्यूनंतर त्याच्या कंपनीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. कंपनीला त्यांच्या गुंतवणूकदारांना पैसे द्यायचे आहेत. परंतू पासवर्डच नसल्याने त्यांचे हात बांधले गेले आहेत. त्यामुळे गेरॉल्डची पत्नी जेनिफर रॉबर्टसन्‌ने या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी सरकारकडून परवानगी मागितली आहे. तसेच कंपनीने नोव्हा स्कोटिया सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली. या आर्थिक संकटातून योग्य तो मार्ग काढवा, अशी न्यायालयाला विनंती करण्यात आली आहे.

गेरॉल्डचा मृत्यू झाला तेव्हा त्याचा लॅपटॉपही त्याच्याजवळच होता. पण तो इन्क्रीप्टेड्‌ असल्याने पासवर्ड शोधण्यात तज्ज्ञांना अधिकच अडचणी येत आहेत. जोपर्यंत गेरॉल्डच्या अकाउंटचा पासवर्ड रिकव्हर होत नाही तोपर्यंत कॅनडातल्या 11 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांचे भवितव्य आधांतरीच आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×