बुध -चाकूचा धाक दाखवत 90 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना बुधवारी खटाव तालुक्यातील बुध येथे घडली. याप्रकरणी मंगल गोरख फडतरे यांनी पुसेगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
अधिक माहिती अशी, मंगल गोरख फडतरे या बुध येथे एकट्या राहत असून त्या बुधवारी रात्री 10.30 वाजता नेहमीप्रमाणे जेवण करून झोपल्या होत्या. रात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घराच्या पाठीमागील दरवाज्याच्या फटीतून हात घालून कडी काढली.25 ते 30 वयोगटातील चोरट्यांनी डोळ्यावर बॅटरीचा प्रकाश पडल्यामुळे त्यांना जाग आली. यावेळी संबंधित चोरट्यांनी मंगल फडतरे यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजळील कर्णफुले व मंगळसूत्र काढून घेतले. तसेच घरातील पेटीत असणारे एक हजार रुपये घेवून पलायन केले.