पुणे: पुणे विभागात कोरोनाबाधितांची संख्या शुक्रवारी १०१ वर पोहचली आहे. पुण्यात ५७ , पिंपरी चिंचवड १४ , सातारा ३ , सांगली २५ आणि कोल्हापूर २ रुग्ण असल्याची माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
डॉ. दिलेल्या माहितीनुसार २०१८ नमुने तपासणीसाठी नमुने पाठवण्यात आले होते. त्यापैकी १८७८ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेलेआहे. तर १४० नमुन्याचे अहवाल प्राप्त झालेले नाहीत.
मिळालेल्या अहवालापैकी १७७७ नमुने निगेटीव्ह आहेत तर १०१ नमुने पॉझिटीव्ह आहेत. आतापर्यंत १८ कोरोनाबाधितांना रुग्णलयातून सोडण्यात आले आहे. विभागामधील 8 हजार 178 प्रवाशांपैकी 3 हजार 996 प्रवाशांबाबत प्रशासनाचा फॉलोअप सुरू आहे. अन्य 4 हजार 282 प्रवाशांचा फॉलोअप पूर्ण झाला आहे.
आजपर्यंत 15 लाख 61 हजार 992 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. त्याअंतर्गत 72 लाख 87 हजार 291 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 490 व्यक्तींना अधीक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी दिली.
पुढे बोलतांना ते म्हणाले, पुणे विभागात एकूण ८८ ठिकाणी क्वारंटाइन सुविधा निर्माण करण्यात आलीआहे. या ठिकाणी एकूण १२ हजार ८४८ बेडस उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच ५२ ठिकाणी आयसोलेशन सुविधा निर्माण करण्यात आली आहे.
या ठिकाणी एकूण २१६७ बेडस उपलब्ध आहेत, त्याप्रमाणे विभागात शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांचे रुग्णालयांकडे सद्यस्थितीत एकूण एन-95 मास्क ४९ हजार ८४५ ट्रिपल लेअर मास्क ४ लाख ६९ हजार १९४ एवढे उपलब्ध आहेत. तसेच ३ हजार ७८१ पीपीई किट तसेच १२ हजार ९४४ सॅनीटायझर उपलब्ध असल्याचे आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले.