Covid 19 | 25 राज्यांसाठी केंद्राची 8923 कोटींची मदत मंजूर

नवी दिल्ली, दि. 9 – केंद्र सरकारने 25 राज्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 8923 कोटी रूपयांची मदत घोषित केली आहे. ही मदत ग्रामीण भागातील कोविड नियंत्रणासाठी उपयोगी पडणार आहे. काल शनिवारी अर्थमंत्रालयाने हा निधी मंजुर केला. गाव, ब्लॉक आणि जिल्हा पातळीवर हा निधी वापरता येईल असे सरकारी निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार हा निधी मंजूर करण्यात आला आहे. आधीच्या नियोजनानुसार राज्यांच्या मदतीसाठीचा हा निधी जून महिन्यात मंजूर केला जाणे अपेक्षित होते; पण कोविडची स्थिती लक्षात घेऊन थोडा लवकरच या निधीचा पहिला हप्ता मंजूर करण्यात आला आहे. वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार राज्यांतील पंचायत राज समित्यांना हा निधी नियमितपणे वितरीत केला जातो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.