करोना काळात सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता
पुणे – करोना काळात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामावर आधारित पुस्तकाची निर्मिती मध्य रेल्वेने केली असून, महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्या हस्ते या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.
करोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देखील मध्य रेल्वेकडून सेवा देण्यात येत होती. या कामांचा आढावा घेण्यासाठी मध्य रेल्वेने “करोना योद्धा’ या पुस्तिकेची निर्मिती केली आहे. मंगळवारी प्रकाशनावेळी अपर महाव्यवस्थापक बी.के. दादाभोय, मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार आदींसह यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मध्य रेल्वेच्या सर्व विभागांचे व्यवस्थापक उपस्थित होते.
मध्य रेल्वेचे डॉक्टर, निमवैद्यकीय अधिकारी यांसह विविध विभागांच्या करोना योद्ध्यांच्या पथकांनी या कालावधीत समर्पित आणि प्रामाणिकपणे उत्कृष्ट काम केले असून, या कामाचे चित्रण करण्याचे काम पुस्तिकेद्वारे केले आहे.