पुणे – रेल्वेने लॉकडाऊननंतर मालवाहतुकीवर अधिक भर दिला होता. मध्य रेल्वेने मागील वर्षी केलेल्या मालवाहतुकीच्या तुलनेत मागील तीन महिन्यांत प्रतिमहिना सरासरी 2 टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून, एप्रिल 2020 ते मार्च 2021 या कालावधीत सुमारे 57.97 दशलक्ष टन मालवाहतूक केली आहे.
मध्य रेल्वेने 1 एप्रिल ते 13 मार्च या कालावधीत सुमारे 57.97 टन मालवाहतूक केली. त्यापैकी डिसेंबर ते फेब्रुवारी या मागील तीन महिन्यांत वाहतुकीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत सातत्याने 2 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
रेल्वेने 28.72 दशलक्ष टन कोळसा, 1.54 दशलक्ष टन धान्य आणि साखर, 3.07 दशलक्ष टन खते, 4.82 दशलक्ष टन पेट्रोलियम उत्पादने, 1.74 दशलक्ष टन लोखंड आदी वस्तुंची वाहतूक केल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मागील तीन महिन्यांत मालवाहतुकीत वाढ
महिना – वजन
डिसेंबर 2019 – 5.72 दशलक्ष टन
डिसेंबर 2020 – 5.87 दशलक्ष टन
जानेवारी 2020 – 5.96 दशलक्ष टन
जानेवारी 2021 – 6.16 दशलक्ष टन
फेब्रुवारी 2020 – 5.80 दशलक्ष टन
फेब्रुवारी 2021 – 5.93 दशलक्ष टन