नवी दिल्ली – केंद्र सरकार ठरल्याप्रमाणे या वर्षी मध्य प्रदेशातून 67.25 लाख टन गहू खरेदी करणार आहे. यापेक्षा जास्त गहू खरेदी करण्यास मर्यादा आहेत असे केंद्रीय सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी स्पष्ट केले आहे.
मध्य प्रदेश सरकारने मोठा बोनस देऊन 100 लाख टन गहू खरेदी केला आहे. मात्र हा सर्व गहू केंद्र सरकार स्वीकारणार नसल्याचे पासवान यांनी सूचित केले. आम्ही मध्य प्रदेशातून 28 लाख खरेदी करणे अपेक्षित होते मात्र ती मर्यादा जास्तीत जास्त 67.25 लाख टनापर्यंत वाढविली जाऊ शकते.
देशात या वर्षी गव्हाचे विक्रमी उत्पादन झाले आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी गहू खरेदीची मर्यादा वाढवून मागितली आहे. याबाबत केंद्र सरकार विचारविनिमय करीत असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकार 411 लाख टन गहू गव्हाचा साठा करणे अपेक्षित आहे.