नवी दिल्ली – सध्या देशभरामध्ये बनावट हेल्मेट, प्रेशर कुकर, गॅस सिलेंडरचा सुळसुळाट झाला आहे. या विरोधात केंद्र सरकारने मोहीम सुरू केली आहे. ग्राहक संरक्षण नियंत्रकांनी या विरोधात मोहीम सुरू केली असून बऱ्याच वस्तूवर बनावट आयएसओ मार्क लावल्याचे आढळून आले आहे.
नियंत्रकांनी अगोदरच ऍमेझॉन, फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपन्यांच्या व्यासपीठावरून अशा प्रकारच्या वस्तूची विक्री केल्याबद्दल या कंपन्यांना नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर काही रिटेल दुकानदारांनी अशा बनावट वस्तू विकल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भात ग्राहक संरक्षण आयुक्त निधी खरे यांनी सांगितले की, आमच्याकडे बऱ्याच ग्राहकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर आम्ही पाहणी केली असता ई- कॉमर्स व्यासपीठावरून आणि प्रत्यक्ष दुकानातून काही बनावट वस्तू विकल्या जात असल्याचे आढळून आले आहे. त्यामध्ये प्रेशर कुकर, हेल्मेट आणि गॅस सिलेंडरचा जास्त समावेश आहे.
प्रत्यक्ष दुकानातून बनावट वस्तूंची विक्री केली जात असल्याचे आम्हाला आढळून आले आहे. त्यामुळे आम्ही देशभरातील जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात चौकशी करून दोन आठवड्यात अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ई-कॉमर्स कंपन्यांच्या वेबसाईटकडे लक्ष देण्यात येत आहे.
नागरीकांनी सावध राहण्याची गरज
ग्राहकांनीही याबाबत सावध राहण्याची गरज आहे. ई-कॉमर्स कंपन्याकडून वस्तू खरेदी करताना या वस्तू वर आयएसआय मार्क आहे का याची शहानिशा करावी. त्याचबरोबर हा मार्क अधिकृत आहे का हे वस्तू आल्यानंतर तपासून पहावे. या उत्पादनावर आयएसआय मार्क बंधनकारक आहे याची नागरिकांना जाणीव असायला पाहिजे. यातील बरीच उत्पादने प्रत्येक घरात वापरली जातात. त्यामुळे सुरक्षिततेच्या प्रश्न असतो असे त्यांनी सांगितल