नवी दिल्ली – सप्टेंबर महिन्यात देशातील जीएसटी कलेक्शन वाढले असून, गेल्या पाच महिन्यांतील सर्वाधिक कलेक्शन सप्टेंबर महिन्यात नोंदवले गेले आहे. या महिन्यात एकूण जीएसटी कलेक्शन 1 लाख 17 हजार कोटींवर गेले आहे.
या आधी एप्रिल महिन्यात सर्वाधिक जीएसटी कलेक्शन नोंदवले गेले होते, त्यावेळी झालेले कलेक्शन हे 1 लाख 41 हजार कोटी रुपये इतके होते. ऑगस्ट महिन्यात 1 लाख 12 हजार कोटी रुपये, तर जुलै महिन्यात 1 लाख 16 हजार कोटी रुपये कलेक्शन झाले होते. सप्टेंबर महिन्यात आयात वस्तूंवरील आयात करही 30 टक्क्यांनी वाढला आहे.
जीएसटी कलेक्शनमध्ये होणारी वाढ ही देशात आर्थिक ऍक्टिव्हिटी वाढत असल्याचे लक्षण मानले जात आहे. पुढील काळात हे कलेक्शन आणखी वाढण्याची शक्यता आहे.