Puja Khedkar: अनेक दिवसांपासून वादात सापडलेल्या पूजा खेडकरची आयएएस सेवा तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात आली आहे. प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर तिच्या अपंगत्व आणि इतर अनियमिततेमुळे बराच काळ वादात होती. केंद्र सरकारने शुक्रवारी (6 सप्टेंबर, 2024) एक आदेश पारित करून तीला भारतीय प्रशासकीय सेवेतून (IAS) मुक्त केले आहे. पूजा खेडकर 2023 मध्ये आयएएस परीक्षा उत्तीर्ण झाली होती, तर त्यापूर्वी ती नऊ वेळा या परीक्षेत नापास झाली होती. अशा परिस्थितीत 2023 च्या परीक्षेला बसण्याचा अधिकार तीला नव्हता त्यामुळे तीने ही परीक्षा बनावट पद्धतीने दिली. या आधारावर तीची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे.
आदेशात म्हटले आहे की, केंद्र सरकारने पूजा मनोरमा दिलीप खेडकर, IAS प्रोबेशनर (MH:2023) यांना IAS (प्रोबेशनरी) नियम, 1954 च्या नियम 12 अन्वये तात्काळ प्रभावाने भारतीय प्रशासकीय सेवेतून (IAS) कार्यमुक्त केले आहे.
सरकारी आदेश –
सरकारी आदेशात असे लिहिले आहे की पूजा मनोरमा दिलीप खेडकर, IAS प्रोबेशनर (MH: 2023) नागरी सेवा परीक्षा- 2022 आणि मागील CSE मध्ये उमेदवार होण्यासाठी अपात्र असू शकतात असे वृत्त समोर येताच, तिच्या उमेदवारीचे दावे पडताळण्यासाठी 11.07.2024 रोजी एक सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली.
एकल सदस्य समितीने 24.07.2024 रोजी आपला अहवाल सादर केला. एकल-सदस्यीय समितीच्या अहवालातील निष्कर्ष लक्षात घेऊन सरकारने आयएएस (प्रोबेशन) नियम 1954 मधील नियम 12 मधील तरतुदींनुसार संक्षिप्त चौकशी केली. ज्यात खेडकर यांना वाजवी संधी देण्याचाही समावेश होता. असे आढळून आले की, पूजा मनोरमा दिलीप खेडकर, IAS प्रोबेशनर (MH: 2023) यांनी 2012 ते 2023 दरम्यान CSE साठी अर्ज केला होता आणि त्यात उपस्थित झाली होती.
पूजाने सादर केलेल्या माहितीनुसार, ती CSE-2012 आणि CSE-2023 दरम्यान नऊपेक्षा जास्त वेळा परीक्षेला बसली होती. OBC श्रेणीतील उमेदवारांना जास्तीत जास्त नऊ परीक्षांना बसण्याचा अधिकार आहे. 2012 ते 2020 दरम्यान म्हणजेच CSE-2022 पूर्वी नागरी सेवा परीक्षांमध्ये तीने जास्तीत जास्त प्रयत्न पूर्ण केले होते. CSE नियम 2022 चा नियम 3 वेगवेगळ्या श्रेणीतील उमेदवारासाठी जास्तीत जास्त प्रयत्नांची परवानगी देतो. OBC आणि PWBD साठी नऊ (09) प्रयत्न आहेत.
आयएएस (प्रोबेशनरी) नियम, 1954 च्या नियम 12 मध्ये परिवीक्षाधीन सेवेत भरतीसाठी अयोग्य असल्याचे आढळून आल्याने तीला कार्यमुक्त करण्याची तरतूद आहे. संक्षिप्त तपासणीनंतर, असे आढळून आले की ज्या वर्षी तिची IAS मध्ये निवड आणि नियुक्ती झाली होती तेंव्हा पूजा अपात्र होती. त्यामुळे ती भारतीय प्रशासकीय सेवेत भरतीसाठी अपात्र ठरली. केंद्र सरकारने 06.09.2024 च्या आदेशाद्वारे IAS (प्रोबेशनरी) नियम, 1954 च्या नियम 12 अंतर्गत पूजा मनोरमा दिलीप खेडकर, IAS प्रोबेशनरी (MH:2023) यांना भारतीय प्रशासकीय सेवेतून तत्काळ प्रभावाने मुक्त केले आहे.