“भाजपचं हित बघूनच केंद्र सरकार निर्णय घेतं”

मुंबई – देशातील करोना परिस्थिती गंभीर आहे. स्पष्ट सांगायच तर हाताबाहेर गेली आहे. पण देशाच्या राज्यकर्त्यांनी करोना गांभीर्याने घेतलेला दिसत नाही. आज बंगालमध्ये जे शक्तिप्रदर्शन सुरू आहेत. तुम्हाला काय वाटतं तिकडे करोना नाही. याचं भयावह चित्र नंतर दिसेल, असे म्हणत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी देशातील करोना परिस्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. पश्‍चिम बंगालमधील निवडणुका पार पडल्यानंतर केंद्र सरकार लॉकडाउनसंदर्भात निर्णय घेऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.

माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, देशातंर्गत युद्ध आहे. फडणवीस यांना माहिती असेल सरसंघचालक मोहन भागवत, भैय्याजी जोशी करोनामुळे आजारी आहे. सर्व लोक करोनाशी झूंज देत आहे. महाराष्ट्राचे म्हणून एकत्र आले पाहिजे. सत्ताधारी आणि विरोधकांनी हे डोक्‍यातून काढले पाहिजे की, आपल्या विरोधकांना करोना होईल, आपल्याला होणार नाही.

महाराष्ट्रातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना सर्वांची बैठक घेऊन गांभीर्य समजावून सांगितले. मुख्यमंत्र्यांनी संकेत दिलेत की, लॉकडाउनशिवाय पर्याय नाही. ही स्थिती संपूर्ण देशाचीच आहे. देशपातळीवर असा निर्णय घेण्याबद्दल पावलं टाकली जात आहेत का?, असे चित्र मला दिसत, असे राऊत म्हणाले.

प्रत्येक वेळी केंद्र आपल्या पक्षाचं (भाजपाचं) हित बघून अशा प्रकारचे निर्णय घेताना दिसत आहे. पक्ष निवडणुकीत उतरला आहेत. प्रचार सुरू आहे, असं म्हणून माणसांना मारता येणार नाही. धर्म, जात, निवडणुका यापेक्षाही लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत. निवडणुका कधीही घेता येईल. राजकारण कधीही करता येईल. लोकांचे जीव महत्त्वाचे.

जगभरात लॉकडाउन हाच एकमेव पर्याय आहे. अमेरिका, युरोपसह अनेक राष्ट्रांनी पुन्हा एकदा कडक निर्बंध लादायला सुरुवात केली. जास्तीत जास्त लसीकरण.. रेमडेसिवीर यांचा साठा मुबलक उपलब्ध करून देणे, हे केंद्र सरकारचं कर्तव्य आहे. त्याचं खापर कोणत्याही राज्यावर फोडू नका. जसे पुण्यात महापौरांचे प्रकरण झाले. केंद्राकडून लसी आणल्या. मग केंद्राकडून आणल्यात, तर मुंबईलाही पाठवा. त्यातील खोटारडेपणा सिद्ध झाला, असे म्हणत राऊत यांनी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.