बारामती – बारामती तालुक्यामध्ये कोविड-19 विषाणूचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात होत आहे. करोना संसर्ग झालेल्या रूग्णाकडून जादा बील आकारल्याबाबतच्या तक्रारी, औषधांचा भासत असलेला तुटवडा, औषध व इंजेक्शन वेळेत व माफक दरात रूग्णांना उपलब्ध करून देण्यासाठी व त्यावर तात्काळ नियंत्रण आणण्यासाठी बारामती तालुका मध्यवर्ती सुविधा केंद्र, बारामती नगरपरिषद बारामती येथे सुरू करण्यात आले आहे.
सुविधा केंद्रामध्ये बेड व्यवस्थापन कक्ष, अत्यावस्थ रूग्ण व्यवस्थापन कक्ष, रूग्णवाहिका व्यवस्थापन कक्ष, औषध व ऑक्सिजन व्यवस्थापन कक्ष, बील तपासणी कक्ष, आदी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. कक्षाचे प्रमुख पुढीलप्रमाणे- बेड व्यवस्थापन कक्ष प्रमुख गणेश कराड (उपअधिक्षक, भूमीअभिलेख,), मो. नं – 9767422975, अत्यावस्थ रूग्ण व्यवस्थापन कक्ष प्रमुख भानुदास साळवे, (सहायक गट विकास अधिकरी), मो. नं – 9850930692 या दोन्ही कक्षांचा संपर्क क्रमांक – 7768808715 आहे. रूग्णवाहिका व्यवस्थापन कक्ष प्रमुख दत्तात्रय पडवळ (तालुका कषि अधिकारी), मो. नं – 9767215274 , औषध व ऑक्सिजन व्यवस्थापन कक्ष प्रमुख- नांगरे (ड्रग इन्स्पेक्टर), मो. नं – 7387561343 या दोन्ही कक्षांचा संपर्क क्रमांक – 7768808716 आहे. बील तपासणी कक्ष प्रमुख- धनंजय गाडे (लेखा परीक्षक वर्ग-2 सहकारी संस्था), मो. नं- 9175939664, कक्ष संपर्क क्रमांक – 7768808717 आहे.
ज्या करोना रूग्णास बेड, रूग्णवाहिका, औषध, ऑक्सिजन व जादा बील आकारल्याबाबतच्या तक्रारी असल्यास वरील कक्ष प्रमुखांशी संपर्क साधावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.