नवी दिल्ली – केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथक गुजरात,महाराष्ट्र आणि तेलंगणला 26 ते 29 जून दरम्यान भेट देणार
आहे. हे पथक राज्याच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून कोविड-19 व्यवस्थापना बाबत सुरु असलेले प्रयत्न बळकट करण्यासाठी समन्वय साधेल.
देशभरात चाचणी सुविधात लक्षणीय वाढ करत, भारतात आता 1007 निदान प्रयोगशाळा आहेत. यामध्ये 734 सरकारी क्षेत्रातल्या तर 273 खाजगी प्रयोगशाळांचा समावेश आहे. जलद आरटी पीसीआर
आधारित निदान प्रयोगशाळा – 559,
ट्रू नॅट आधारित निदान प्रयोगशाळा – 364, सीबीएनएएटी आधारित निदान प्रयोगशाळा – 84 इतक्या आहेत. जानेवारी मधल्या मर्यादित चाचण्यावरून आता गेल्या 24 तासात 2,07,871चाचण्या करण्यात आल्या, त्यामुळे चाचण्यांची संख्या आता 75 लाखाहून अधिक होत 75,60,782 झाली आहे.
गेल्या 24 तासात 13,012 कोविड-19 रुग्ण यातून बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 2,71,696 रुग्ण कोविड-19 मधून बरे झाले आहेत. कोविड-19 मधून रुग्ण बरे होण्याचा दर आता 57.43 % झाला आहे. सध्या 1,86,514 सक्रीय रुग्ण असून हे सर्व रुग्ण वैद्यकीय देखरेखीखाली आहेत. भारतात सध्या प्रती लाख लोकसंख्येमध्ये 33.39 रुग्ण असून जागतिक स्तरावर हे प्रमाण लाखभर लोकसंख्येत 120.21 रुग्ण आहे. देशात लाखामागे मृत्यूचे प्रमाण 1.06 असून जगातल्या कमी मृत्यू प्रमाणात याचा समावेश आहे,जागतिक स्तरावर हे प्रमाण लाखामध्ये सरासरी 6.24 मृत्यू इतके आहे.