नवी दिल्ली – सीबीएसई बोर्डाचे दहावीचे निकाल दुपारी 2 वाजता सीबीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहेत. यंदा दहावीचा निकाल 91.1 टक्के लागला आहे. केरळमधील भावना एन शिवदास हिने 500 पैकी 499 गुण मिळवित सीबीएसई बोर्डात टाॅप येण्याचा मान मिळवला आहे.
Bhavana N Sivadas from Kerala is the all India topper in CBSE Class-10th Exams with 499 marks out of 500. https://t.co/wInuOIpNH5
— ANI (@ANI) May 6, 2019
विभागीय निकालामध्ये त्रिवेंद्रम (99.85%) विभागाने बाजी मारली आहे. तर दुसऱ्या स्थानी चेन्नई (99%) तर तिसऱ्या स्थानी अजमेर विभाग (95.89%) आहे. सीबीएसई बोर्डाचा निकाल हा cbseresults.nic.in आणि cbse.nic.in वर ऑनलाईन घोषित केला आहे.