‘मनरेगा’ कामांसाठी केंद्राने राज्यांना वाढीव निधी उपलब्ध करून द्यावा : सुप्रिया सुळे

नवी दिल्ली : लोकसभेमध्ये आज शून्यप्रहरादरम्यान आपले मत मांडताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारने दुष्काळ प्रभावित राज्यांमध्ये ‘मनरेगा’च्या कामांसाठी वाढीव निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली.

यावेळी बोलताना सुळे यांनी, २०१७-२०१८ या आर्थिक वर्षामधील देशातील रोजगाराच्या परिस्थितीचा लेखाजोखा मांडणारा राष्ट्रीय नमुना सेवा संस्थेचा अहवाल केंद्र सरकारने जाहीर केला नसल्याचे देखील लोकसभा अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच २०१६पासून केंद्र सरकारने रोजगार विनिमय अंतर्गत नोंदणी केलेल्या आणि रोजगार मिळालेल्यांची संख्या देखील जनतेस खुली केलेली नाही.

सुप्रिया सुळे यांनी नीती आयोगाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या नव भारत@७५ अहवालामध्ये नमूद करण्यात आलेल्या आकडेवारीवर प्रकाश टाकताना सांगितले की, “नीती आयोगाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीमध्ये देशातील एकूण पदवीधारकांपैकी ५३% पदवीधारक नौकरीसाठी सक्षम नाहीत. अशातच केवळ ५.४% भारतीयांनाच कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आलेलं असल्याने भविष्यामध्ये बेरोजगारीमध्ये आणखीन वाढ होऊ शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.