नवी दिल्ली (प्रतिनिधी) – राज्यातील मत्स्य व्यवसायातील समस्या सोडविण्यासाठी केंद्राची सकारात्मक भूमिका असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर यांनी दिली. केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरूषोत्तम रूपाला यांच्यासोबत ॲड. नार्वेकर यांनी आज भेट घेतली.
या भेटीत राज्यातील मत्स्य व्यवसायात येणा-या समस्या मांडल्या. यावर केंद्र शासनाकडून यावषियक समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल असे सकारात्मक आश्वासन केंद्रीय मंत्री रूपाला यांनी दिल्याचे नार्वेकर यांनी बैठकीनंतर सांगीतले.
विधानसभा अध्यक्ष ॲड @rahulnarwekar यांनी आज केंद्रीय मत्स्य व्यवसाय तथा पशुसंवर्धन मंत्री यांची भेट घेतली. या बैठकी विषयी त्यांनी #MahaInfoCntre ला माहिती दिली. pic.twitter.com/gOPNzW3HgH
— महाराष्ट्र परिचय केंद्र (@MahaGovtMic) August 8, 2022
समुद्रामध्ये विशिष्ट आर्थिक क्षेत्र अंतर्गत म्हणजे 12 नॉटीकल माईल सीमेच्याबाहेर येणा-या अडचणीबद्दल काही मागण्या मच्छीमारांच्या होत्या. त्यावर आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
याबैठकीस मच्छीमारांचे शिष्टमंडळही उपस्थित होते. मच्छीमारांना येत असणा-या समस्या त्यांनीही मांडल्या. यावर केंद्रीय मंत्री यांनी सांगितले, लवकरच याविषयावर उपाययोजना सुचवून त्याची अमंलबजावणी केली जाईल.