ला लीगा फुटबॉल स्पर्धेत सेल्टा व्हिगोकडून बार्सिलोना पराभूत

नवी दिल्ली – ला लीगा फुटबॉल स्पर्धेत रात्री झालेल्या सामन्यात सेल्टा व्हिगोकडून बार्सिलोनाला 0-2 अशा धक्‍कादायक पराभवाचा सामना करावा लागला आहे.

लिओनेल मेसी, लुइस सुआरेझ, फिलिपे कुटिन्हो यांसारख्या अव्वल खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या बार्सिलोनाच्या दुसऱ्या फळीच्या संघाला आपला खेळ उंचावताच आला नाही. त्यातच औसमाने डेम्बेले याला दुखापतीमुळे पहिल्या सत्राच्या सुरुवातीलाच मैदान सोडावे लागले. डेम्बेलेच्या मांडीचे स्नायू ताणले असले तरी तो लिव्हरपूल विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यापर्यंत तंदुरुस्त होईल, अशी आशा बार्सिलोनाने व्यक्त केली.

गेल्या आठवडयात बार्सिलोनाने ला लीगाच्या विजेतेपदावर कब्जा केल्यामुळे त्यांना या पराभवाने फारसा फरक पडणार नाही. मात्र या विजयामुळे सेल्टा व्हिगोचा आत्मविश्वास उंचावला असून तळाच्या तीन संघांपेक्षा ते पाच गुणांनी आघाडीवर आहेत. मॅक्‍सिमिलानो गोंझालेझ (67व्या मिनिटाला) आणि इयागो अस्पास याने (88व्या मिनिटाला) पेनल्टीवर केलेल्या गोलाच्या बळावर सेल्टा व्हिगोने हा सामना आरामात जिंकला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.